नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी. पी. चंदनखेडे मनपाच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मनपा आयुक्त सभाकक्षात शुक्रवारी (ता. ३०) आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी श्री. बी. पी. चंदनखेडे यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त श्री. राजेश भगत,उपायुक्त श्री. गणेश राठोड, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक संचालक नगररचना विभाग श्री. ऋतुराज जाधव, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा आयुक्तांनी श्री. बी. पी. चंदनखेडे यांच्या सेवाकार्यातील आठवणींना उजाळा दिला. बी. पी. चंदनखेडे यांच्या कार्यकाळात अग्निशमन विभागाने कमी मनुष्यबळ असतांना देखील उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन विभागाच्या 22 केंद्रांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात केला. त्यांनी तणावमुक्त राहून शांतपणे विभागाची धुरा सांभाळली, असल्याची भावना मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. बी. पी. चंदनखेडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच दोन वर्षाच्या कार्यकाळात कमी मनुष्यबळ असताना देखील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन चांगले काम केले असल्याचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले व शेवटी त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी अग्निशमन विभागातील श्री. सतीश रहाटे, श्री. सुनील डोकरे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मनपाचे इतर १७ कर्मचारी सेवानिवृत्त
श्री. बी. पी. चंदनखेडे यांच्यासह नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत इतर १७ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांच्या हस्ते श्रीमती ममता प्रजापती, श्री.संजय दहिकर, श्री. अरुण मेहरुलीया, श्री दिवाकर पडोळे, श्रीमती मीना बनपूरकर, श्रीमती अंजली कावळे, श्रीमती संध्या शेंडे, श्रीमती ज्योती गंधरवार, श्रीमती छाया तभाने, श्रीमती फरजाना बेगम शेख सुभान, श्री. मोहम्मद इकबाल युसुफ शेख, श्री. अशोक अंबागड, श्री. दामोदर खडगी, श्री. सय्यद रमजान अली, श्री. संजय दामणकर, श्री. प्रदीप गजभिये श्री.प्रकाश मेश्राम या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मनपाच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जनसंपर्क विभागाचे श्री. अमोल तपासे उपस्थित होते.
The post मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे मनपा सेवेतून निवृत्त appeared first on Nagpur Today : Nagpur News.